Pages

Monday, July 22, 2019

छाती ठोकून सांगतोय

मुर्त्यांना पुजण्यापेक्षा,
माणूसकिला पूजतो मी
काल्पनिक देवांना न मानता,
फुले, शाहू, आंबेडकरांना वाचतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

पोथ्या, पुराणे वाचण्यापेक्षा
शिवरायांना वाचतो मी
दगडासमोर त्या कशाला झुकू
जिजाई, सावित्री, रमाईपुढे नतमस्तक होतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

घामाचे पैसे दानपेटीत टाकून,
भटांची घरे भरत नाही मी
तहानलेल्यांना पाणी,
भूकेलेल्यांना अन्न देऊन,
त्यांच्यातच देव शोधतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई म्हणून जगण्यापेक्षा,
माणूस म्हणून जगतो मी
धर्मातील पाखंडांना न जपता,
माणूसपणालाच जपतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

कर्तुत्ववान माणसापेक्षा,
दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी
मंत्र, होमहवन, कर्मकांड यांना पायाखाली तुडवून,
मनगटावर भरवसा ठेवतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,
थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी
अंधश्रद्धेला मातीत लोळवून,
विज्ञानवाद स्विकारतो मी
छाती ठोकून सांगतोय,
असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

-डॉ.नरेन्द्र दाभोळकर

No comments:

Post a Comment