महाराष्ट्र के अन्दर वारकरी सम्प्रदाय के संतों ने 13 वी शदी के दौरान समाज में अलख जगाने के जो छंद क्षेत्रीय भाषा में गाये, उन्हें अभंग के नाम से जाना जाता है.यह एक प्रकार से हिंदी के छंद की तरह है. मोटे और पर छंद के उलट, अभंग में मात्राओं के स्थान पर अक्षरों की संख्या गिनी जाती है.अक्षरों की संख्या का पालन कठोरता से नहीं किया जाता.बल्कि,यों कहना सही होगा कि उच्चारण की सुविधानुसार अक्षरों की संख्या कम-ज्यादा हो सकती है.
अभंग दो प्रकार के होते हैं-चार चरणों के और दो चरणों के.चार चरणों वाले अभंग की प्रथम तीन चरणों में 6-6 अक्षर होते हैं जबकि अंतिम चरण में चार अक्षर. इसके साथ ही दूसरे और तीसरे चरणों में यमक का पुट होता है.रही बात चौथा चरण की तो वह अभंग को पूर्णता प्रदान करता है-
काय करूँ आता , धरुनिया भीड़
नि:शंक हे तोंड, वाजविले ।।
नव्हे जगी कोणी,मुक्तियांचा जाण
सार्थक लाजुण, नव्हे हित ।।
दो चरणों वाले अभंग के प्रत्येक चरण में 8-8 अक्षर होते हैं और अंत में यमक होता है-
जे का रंजले गांजले । त्यासी म्हणे जो आपुले।।
.....................................................................................................................
वाचे चा रसाळ अंतरी निर्मळ । त्याचा गळा माळ, असो-नसो ।।
आत्म अनुभव,चोखडळया वारा । त्याचा माथा ज़रा,असो-नसो ।।
पर-स्त्रीच्या ठायी,जो का नपुसंक । त्याचा अंगा राख, असो-नसो ।।
पर द्रव्या-सी अंधा,निन्देसी तो मुका । तोच संत देखा,तुका म्हणे ।।
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणावी आपुले ।। तोचि साधू ओड्खावा,देव तेथेचि पहावा ।।
म्रदु स्वभाव नवनित,तैसे सज्ज्नाचे चित ।। त्यासी अश्रुगिता नाही,ज्यासी घरी जो ह्रदयी ।।
दया करने पुत्रासी,तोचि दास आणि दासी ।। तुका म्हणे सांगू किती, तोचि भगवंता चि मूर्ति ।।
मुक्त होता परि, बड़े झाला बध्द । घेवुनिया छंद, माझे-माझे
शुक न ही केशी,गोवियले पाय । विसरोनि जाय,पक्ष दोन्हीं ।।
पाप पुण्य अंगी,घेतले जळुन । वर्म नेने कौन,करीता तो ।।
तुका म्हणे वाया, गेले वाया विन । मृग पावे शिण, मृग जळ ।।
सदा असावे, संसारी । लक्ष लावावे परब्रम्ही ।।
संसारा चा धंधा, सर्व ही करवा। निज ध्यास व्हावा, भगवंताचा ।।
तुका म्हणे संती, विवेक कारावा । राग न धरावा, बोलण्याचा ।।
संत पावले सागरी । गंगा आली आम्हा वरी ।।
जेथे उळे रज धूळ । तेथे करावे आंघोळ ।।
सेतू बंध वाराणसी । सर्व तीर्थ पायापासी ।।
तुका म्हणे धन्य झालो । संत पावली मिळालो ।।
रूप पाहता लोचनी । सुख झाले हो साजनी ।।
तोहा विठ्ठल बरवा । तोहा माधव बरवा ।।
बहुत सुक्रता ची जोडी। म्हणोनी विठ्ठल आवळी ।।
सर्व सुखाचे सागर। बाप रुख्मा देविवर ।।
मोक्ष पद तुच्छ केली या कारणे । आम्हा जन्म घेणे,युगा युगी ।।
नर नारी बाळ,अवघे नारायण । ऐसे माझे मन, करि देवा ।।
नारायण मूर्ती न कळे जयासी । तया गर्भवासी, येणे जाने ।।
अवघा चा संसार, सुखाचा करिन । आनंद भरीन,तिन्ही लोका ।।
जाईन गे माय, तया पंढरपुरा । भेटीन माहेरा, आपुलिया ।।
सर्व सुक्रताचे फळ, मी लावीन । क्षेमम्या देईन, पांडूरंगी ।।
बाप रुख्म्या वरु, विठ्ठलाचे भेटी । आपुलिया स्वसाठी, करुनी ठ्ठेला ।।
साधू बोध झाला,नुरोनिया ठ्ठेला । ठ्ठायीच मुराला, अनुभव ।।
कापुराच्या वाती उजडल्या ज्योति। ठ्ठायीच समाप्ति, झाली जैसी ।।
मोक्ष रेखा आल्या, भाग्येविन टला । साधूचा अंकिला,हरि भक्त ।।
ज्ञानदेव गोडी संगति सज्जनी । हरि दिसे जनीवनी, आत्मरूप ।।
शेवटची पाळी, तेव्हा मानुष जन्म । चुकलिया वर्म, फेरा पडे ।।
एक जन्म ओळखी, करा आत्माराम। संसार सुगम, भोगू नका ।।
संसारी असावे, असुनी नसावे। कीर्तन करावे, वेळो वेळा ।।
नामा म्हणे विठ्हो, भक्तचिया द्वारी । घेवूनिया करि, सुदर्शन ।।
तुर्येची परिपक्वता, हेच उन्मुनी अवस्था । निम्बोलीयास मधुरता,जैसी पक्व दशे ।।
तुर्या ते शुध्द वासना,तेथेहाची कळवत पना । उन्मुनी बुझूनि निर्वासना,म्हणुनी गोळ ते ।।
जैसी साखर उदकी विरे,परि तेथेची मधुरता उरे । तैसी तुर्या स्वरूपी मुरे,ते उन्मुनी गा ।।
प्रणवाची अर्ध्द मात्रा, ते तुर्या जान गा मैत्रा । तयाचे स्थान पवित्रा,ब्रम्हरंध्र* ।। मन
ब्रम्हरंध्रा ठ्ठायी मन झाले लीन,केले अमृत पान, सतरावी चे
आम्ही गुरु बोध चे भिखारी,आमची बस्ती ब्रम्हपुरी
बोझे वाहिले स्थुलाचे,गमन केले सूक्ष्माचे
कारण मारगी लागलो ,महाकारणा सी गेलो
तेथे बसे तुर्या रानी,जाणताती संत मुनि
परा तुर्या घरा पुढे , निज स्वरूपाचि दृष्टी उघडे
चोखा म्हणे हेचि सार,जाने तोचि परमेश्वर
तरुवर बीजा पोटी,बीज तरुवरा शेवटी। तैसे तुम्हा-आम्हा झाले,एकाएकी समावले ।।
उदका वरी तरंग,तरंग उदकाचे अंग । तुका म्हणे बिंब छाया,ठ्ठायी पावली विलया ।।
नेनु ग माय, कैसा हा योगी। जो ठ्ठायी जन्मिला तोच ठ्ठायी भोगी ।।
माय कुवारी बाप ब्रम्हचारी। एकवीस पुत्र जिच्या उदरी ।।
पित्याचा अंश घेऊन आला। मातेसी त्याने उपभोग केला ।।
आचार सोळूनी झाला तो भ्रष्ट । मावशी संगे लावला पाट ।।
आणिक एक सांगून काई । बहिण भोगली एक पराई ।।
ज्ञानदेव म्हणे अनुभव जाने । अनुभवा विन काहींच नेने ।।
क्षणो क्षणी हाच करावा विचार। तरा वया पार भव सिंधु ।।
नाशीवंत देह जाना हा सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ।।
संत समागमी धरावे आवळी । करावी तातळी परमार्थाची ।।
तुका म्हणे इही लोकाच्या व्यवहारे। नका डोळे घुरे भरुनि राहो ।।
अमोलिक रत्न संपाळले तुझ । का रे ब्रम्ह बीज न ओळखसी ।।
न जळे न बुळे न भेव चोरा । ते वस्तू चतुरा सेवो सुख ।।
ज्ञानदेव म्हणे अविनाशी जोळले । आणूनि ठ्ठेवले गुरुमुखी ।।
सद्गुरू सारखा असता पाठ्ठी राखा । इतराची लेखा कौन करि ।।
राजयाची कांता काय भीख मांगे। मनाचिया योगे सर्व सिद्धी ।।
कल्प तरु वटी जो कोणी बसला । काय ऊने त्याला सांगा जो जो ।।
ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो । आता उद्धरलो गुरु कृपे ।।
सद्गुरू वाचुनी त्राता त्रिभुवनी। दिन उध्दरणी दुजा नाही ।।
अनंत जन्मीचा शीण उतरला । सद्गुरू भेटला सदानंद ।।
देऊनिया हाती नीज बोध रत्न । तोडीला प्रयत्न संसाराचा ।।
तुका म्हणे गुरु उपकारासी । ......................................।।
हेच दान देगा देवा । मुखी साखरी चा रवा ।।
गुण गाईन आवळी । हेच माझी सर्व जोळी ।।
न लागे धन संपदा । साधू संग देई सदा ।।
तुका म्हणे गर्भ वासी। सुखे घालावी आम्हासी ।।
संत चरण रज,लागता सहज- वासने चे बीज जळुनी जाये ।।
मग राम नाम उपजे आवळी- सुख घळो न घळी,वाळू लागे ।।
कंठ्ठी प्रेम डाटे, नयनी नीर लोटे- हृदयी प्रगटे राम रूप ।।
तुका म्हणे साधन सुलभ गोमट- तरीच उपतिष्टे पूर्वपुण्ये ।।
पापा ची वासना, नको दाउं डोळा- त्याहुनी आँधळा, बराच मी ।।
निंदे चे श्रवण, नको माझे कानी- बधीर करुनी, करि देवा ।।
अपवित्र वाणी, नको माझ्या मुखा- त्याहुनी मुका, बराच मी ।।
नको मज कधी,परस्त्री संगति- जना तुनी माती, उठ्ठ्ता भली ।।
तुका म्हणे मज, अवघ्याचा कंटाळा- तू एल गोपाळा, आवडसी ।।
पापा ची संचिती, देहा सी दंडण- तुझ नारायण, बोल नाही ।
पेरी कडू जिरे, मागे अमृत फळे- अर्क वृक्ष केळे,कैसी येती ।
सुख अथवा दुख, भोग हे देहा चा- नाश हा ज्ञानाचा, न करावा ।
तुका म्हणे आंता, देवाची रुसावे- मनासि पुसावे, काय केले ।
भक्ती चे हे वर्म, जयाचिया हाती,तया घरा शान्ति, क्षमा दया ।
अष्ट महासिद्धी, ओळखती द्वारी,नवजती दूरि, जवळी त्याचा ।
तेथे दुष्ट गुण, न मिळे नि:शेष,चैतनाचा वास, जया माझी ।
संतुष्ट हे चित, सदा सर्व काळ,तुटली हळ हळ, त्रिगुणाची ।
तुका म्हणे येथे, काय तो संदेह,आमचे गौरव, आम्ही कंत ।
भक्त ऐसे जाना, जे देही उदास- गेले आस पास, निवारुनि ।
विषय तो त्याचा, झाला नारायण- ना वळे जन धन, माता पिता ।
निर्वाणी गोविंद, असे मागे पुढे- काहीच साकडे, पडो नेदी ।
तुका म्हणे सत्य, कर्म व्हावे साह्य- घातलिया भय, नरकी जान ।
पिकलिया सेंदे, कळू पण गेले- तैसे आम्हा केले पांडुरंग ।
काम क्रोध लोभ, मुरले ठ्ठायीच- सर्व आनंदा ची स्रष्टी झाली ।
आठ्ठव नाठव, गेले भावा भाव- झाला स्वयेंव, पांडुरंग ।
तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे- संसारी जन्मिजे याचि लागी ।
करुनी आरती - आता ओवाळू श्रीपती
आज पुरले नवस - धान्य काळ हा दिवस
पाहा पाहा हो सकळा- पुण्यवंत तुम्ही बाळा
तुका म्हणे टाळी- होता सन्निध जवळी
आसनी बसुनी, खेचरी साधती- लाल टीखे दिसती, ब्रम्ह नव्हे
दृष्टी लावूनी, नासाग्री तो पाहे- नामी रुपी राहे, ब्रम्ह नव्हे
डोळे लावूनिया, चक्षु चालविती- चिन्मय झळकती, ब्रम्ह नव्हे
मुक्ता बाई म्हणे, ब्रम्ह पाहे डोळा- गुरु-पुत्र विरला, जानतसे
उजळले भाग्य आता - अवघी चिंता वारयली
संत दर्शने चा लाभ - पद्मनाभ जोळ्येला
संपुष्ट हृदय पोटी - करुनिया पोटी साठःविला
तुका म्हणे होता ठ्ठेवा - तोया जिवा सान्पळला
संचित तैसी बुद्धी,उपजे मना मधी - सांगितली सिद्धी, नव जाय
ज्याचा जैसा ठ्ठेवा,तो त्यासी धावे- न लागसी करावे, उपदेश
घेऊन उठती, आपुलाले गुण - भविष्य प्रमाण, तुका म्हणे
पंच भूताचीया,सान्पळलो संदि - घातलो से बंदी अहंकारे
आपला आपण, बान्धविला गळा - नेणेची निराळा, असता हि
कासया हा सत्य, मानिला संसारा - कांहे केले चार, माझे माझे
कोना हि शरण, गेलो नारायण - कोना हि वासना, आवरती
किंचित सुखा चा, धरिला अभिलाष - तेणे काळ नाश, बहु पुढे
तुका म्हणे आता,देह देवू बळी - करुनी सांडू होळी , संचिता ची
क्षमा शास्त्र जया नरा चिया हाती - दुष्ट तया प्रती काय करी
तृण नाही तेथे, पडिला दावाग्नी - जाय तो विझोनी आपोआप
तुका म्हणे क्षमा सर्वाचे हित - धरा अखंडित सुख रूप
सद्गुरू नामका पूर्ण कृपा केली - नीज वस्तू दाखवली माझी मज
माझे सुख मज दाखवले डोळा - दिली प्रेम काळा ज्ञान मुद्रा
तया उतराई होऊ कोन्या गुने - ....................................
जौवरी त्रिपदा सोधना पडे-अर्धे मात्रे परते न सापळे
क्षरा-अक्षरी निवाळा न घडे- उत्तम पुरुषी समरसे मुकुंद मुनि (परमामृत)
तू एक मी एक,हा न तुटे कलंक
जौवरि न होय सम-एक,तवरि परम प्राप्ति कैसे घडे
इहलोकि चा हा देह,देव इच्छिताती पाहे
धन्य आम्ही जन्म आलो,दास विठ्ठोबा चे झालो
आयुष्या चे साधने, सच्चिदानंद पदवी घेणे
तुका म्हणे पावटणी , करू स्वर्गाचि निशानी
चित्त शुध्द करि,शत्रु मित्र होती - व्याघ्रदिक न खाती, सर्प तया
विष ते अमृत , आघात तो हित - अकर्तव्य नित होत त्यासी
दुख: ते देईल सर्व सुख काळ - होतील शीतल,अग्नी ज्वाला
तुका म्हणे कृपा केली नारायण - जानि येत येणे, अनुभव
रात्र दिवस आम्हा,युद्धाचा प्रसंग - अंतर बाह्य जग आणि मन
जिवाहि आगीज पडती आघात - घेवूनीया नित्य-नित्य करि
तुका म्हणे तुझ्या नामाचिया बळे - अवघियाचे काळे, केले तोंड
देह चि विटाळ म्हणती सकळ,आत्मा तो निर्मळ, शुध्द बुध्द
चोखा म्हणे माझा संदेह मिटला,देहीच भेटला,देव आम्हा
नर देहाचे उचित,काही करावे आत्महित
यथानुश्क्यता चीतवीत - सर्वोत्मासी लावावे
माझ्या हे मी पणावर, पडो हे पासान - जळो हे भीषण, माझेपन
आयेका ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्म ज्ञान
पाहावा आपणा सी आपण, या नावे ज्ञान
जड शोधोनिया चैतन्य काढिले,जड काय झाले सांगा मज
दुधा तुनि तूप वेगळे काढिले,दुध काय झाले सांगा मज
गारी तुनि पाणी वेगळे काढिले,गार काय झाले सांगा मज
दागीतुनि सोने वेगळे काढिले,दागि काय झाले सांगा मज
तुका म्हणे आहे स्वयंभू उभा - चैतन्यचा गाभा सिद्ध असो
चहु देही चा खेळ,तोच सद्गुरू चा बाळ
चक्रव्यूह चे उगवणे,आंत जाउन बाहेर येने
गुरुकृपे चे अंजन,तोच आत्म-खून जान
'भागा' सद्गुरू शरण,त्याने केले समाधान
देह हाडका चा केला, रक्त मांसाने लीपिला
मृत्यू आणि वृध्द पण, तैसे मत्सर अभिमान
सर्वे वैरी हे आपुले,देह लपोनी बसले
देह आसक्ती धरू नका,सान्गे तथागत लोका
No comments:
Post a Comment