Friday, October 19, 2018

तुझा च गौतमा पडे प्रकाश अंतरी

तुझा च गौतमा पड़े प्रकाश अंतरी,
तुझे च धम्म-चक्र हे फिरे जगावरी। बुद्धं शरण गच्छामि...

कळ्या कळ्या फुले फुले तुला पुकारती,
पहा तुझी च चालली नभात आरती।
तुला दिशा निहारती यशोधरे परी,
तुझे च धम्म-चक्र हे फिरे जगावरी।

तुझ्या मुळे च जाहला अखेर फैसला,
दिलास धीर तोडल्या आम्ही च शृंखला।
आता भविष्य आमुचे असे तुझ्या करी,
तुझे च धम्म-चक्र हे फिरे जगावरी।

तुला च दुःख आमुचे तथागता कळे,
तुझी च सांत्वना अम्हा क्षणो-क्षणी मिळे।
निनाद पंचशील चा घुमे घरो-घरी,
तुझेच धम्म-चक्र हे फिरे जगावरी।

तुझ्या मुळे च मार्ग हा आम्हास लाभला,
तुझ्या मुळे च सूर्यही पुन्हा प्रकाशला।
तुझे च सत्य यापुढे लढेल संगरी,
तुझे च धम्म-चक्र हे फिरे जगावरी।

तुझ्या समान एकही नसे तुझ्या विना,
सदैव यापुढे करू तुझी च वंदना।
भरेल अमृता परी तुझी च वैखरी,
तुझे च धम्म-चक्र हे फिरे जगावरी।

तुझा च गौतमा पडे प्रकाश अंतरी,
तुझेच धम्म-चक्र हे फिरे जगावरी।  बुद्धं शरण गच्छामि...

गायक-  सुरेश भट्ट, कलाकार- अरविन्द कुमार सोज: इतिहास आहे साक्षी: मराठी एल्बम, 1999

No comments:

Post a Comment