Saturday, March 9, 2019

महाबोधिविहार: तब और अब

Image may contain: outdoor
संजय सावंत की पोस्ट :फेसबुक   8 .3 2019
*बोधगयाचा महाबोधी विहार*
बोधगया या पवित्रस्थळाचा गेल्या अडीच हजार वर्षांचा इतिहास बघितला तर असे दिसून येईल की सम्राट अशोकाने येथे त्याच्या कारकिर्दीत विहार बांधल्यानंतर पाचशे वर्षांनी गुप्तराजवटीत नवीन विहाराचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर कुठल्याही भारतीय राजवटी तर्फे बोधगया येथील विहाराचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही.
मात्र श्रीलंका व म्यानमार ( ब्रम्हदेश ) या भारताबाहेरील देशांनी बोधगया येथील विहाराच्या देखभालीसाठी वेळोवेळी मदत पाठविली आहे. इ.स.१०८४ मध्ये म्यानमारच्या कॅनझीत राजाने निधी सकट मोठी तुकडी बोधगया येथे पाठविली. बाराव्या शतकानंतर तग धरून असलेला बौद्ध धम्म मुस्लिम आक्रमणामुळे अजून खिळखिळा झाला. पण म्यानमारच्या प्रत्येक राजांनी बोधगयाचे पावित्र्य जाणून त्याच्या दुरुस्तीसाठी निधी, दान आणि कारागिरांची कुमक तेथे पाठविल्याचे दाखले मिळतात.
इ.स.१२०० ते १९०० या कालावधीत तर बौद्ध धम्म बराच मागे पडला. या पडत्या काळात इ.स.१४७२ मध्ये म्यानमारचा राजा धम्मजेदी याने महाबोधी विहाराच्या देखभाल दुरुस्तीसाठी मोठी कारागिरांची तुकडी पाठविली असा दाखला आहे. असे प्रत्येक राजाने सन १८७७ पर्यंत केल्यामुळे बोधगयेचे पावित्र्य टिकून राहिले. यास्तव हरेक बौद्ध बांधवाने श्रीलंका व विशेष करून म्यानमार देशाचे ऋण मान्य केले पाहिजे. कारण या देशानेच भारतातील प्रतिकूल परिस्थितीत बोधगयाचे पावित्र्य जपले. तसेच गुरू-शिष्य परंपरेने शुद्ध स्वरूपात टिकवून ठेवलेली विपश्यना ध्यान साधना भारतास व साऱ्या जगास मानवाच्या कल्याणार्थ दिली. अशा या प्यागोड्याच्या देशास माझा प्रणाम.
(सोबत सन १८६५ मधील दुरुस्तीपूर्वीची महाबोधी विहाराची स्थिती दर्शविणारे छायाचित्र )

No comments:

Post a Comment