Wednesday, December 23, 2020

महार म्हणजे सरदार, मुखिया

हिंदी शब्दकोषात महार म्हणजे सरदार,मुखिया,श्रेष्ठ,बड़ा असा आदरसूचक अर्थ दिलेला आहे. खरेतर महार म्हणजे महाआर्य, म्हणजेच महानआर्य. ही गौरवाने दिलेली पदवी आहे.

भ.बुद्धाच्या मते आर्यमनुष्य म्हणजे जो प्राणी हिंसा करीत नाही असा श्रेष्ठ, सुसंस्कृत मनुष्य होय. ऋग्वेदानुसार आर्यमनुष्य म्हणजे सभ्य मनुष्य. म्यक्मुल्लरच्या मते आर्य म्हणजे शेतकरी अर्थात सभ्य मनुष्य होय. पाणिनिच्या मते आर्य म्हणजे उत्तम जन्माचा. आर्यशब्द बौद्ध धम्माशी जोडलेला आहे. अनेक बौद्ध भिक्खुंच्या नावात आर्य गौरवाने लावत. भ.बुद्धाच्या भिक्खू संघास आर्य संघ म्हणत. म्हणूनच महार म्हणजे सर्वश्रेष्ठ, अतिशय सुसंस्कृत किंवा सर्वोतम जण्माचा मनुष्य. पुर्वी सर्व भारताला आर्यावर्त म्हणत. महारगणाचा इतिहास फार पुरातन आहे. श्रीलंकेतील प्रसिद्ध ग्रंथ महावंसमधे इस.पू. 200मधे महाराचा उल्लेख आहे. पराक्रमी, शूर,लढवय्ये नागवंशी महारगणाचे लोक पूर्वी सर्व भारतभर पसरलेले होते व आजही सर्व भारतभर पसरलेले आहेत.

सर्व उत्तरी भारतात ते मेहरा जातीने सवर्ण आहेत.काही ठिकाणी कूळ मेहरा तर जात क्षत्रिय,खत्री,जाट लावतात.mpआणि ओरिसात मेहरा जात scआहे. प.बंगालमधे महर म्हणून sc. आसामसह सर्वपूर्व भारतात ते महरा म्हणून scआहेत.तर कर्नाटक,गुजरात, महाराष्ट्रात ते महार म्हणून SC आहेत.नागवंशी शूर महार लोक पूर्वी राज्यकरते होते.

पैठणचे प्रसिद्ध सातवाहन राजे महार होते.काळ इ. पु. 235 ते इस 230 असा 465 वर्ष प्रदीर्घ काळ त्यानी राज्य केले. त्यांचे राज्य सम्पूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र तर म.प्रदेशातील सांची पर्यंत होते. ते जरी महार होते तरी त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारून धम्म प्रचार केला. त्यांची अनेक सापडलेली नाणी साक्ष देतात. वेरूळ, अजिंठा,अंधेरी,जुन्नर,नाशिकसह अनेक बौद्ध लेण्या त्यांच्या काळात त्यांनी खोदल्या.

सातवाहन म्हणजेच आजचे सातव, साळवे,सातवने होत. राजघराणे अभिर म्हणजे आजचे आहीरे, अहिर, आहेर होत. राजघराणे वाकाटक म्हणजे आजचे वाकोडे,.शिलाहार आजचे शेलार. यादव म्हणजेच जाधव. त्रयकूटक म्हणजेच आजचे तिरकुटे, तिरपुडे होत. हे सर्व महारच राज्यकरते होते. हे सर्व कूळनामे महारातील आहेत. महार व मराठे एकच आहेत.आजच्या मराठयांत म्हारूडे, महाडिक म्हणजेच महारीक, मेहर, महारु इ. कूळनामे याची साक्ष आहेत.

महाराष्ट्रातील महारातील सर्वच कूळनामे मराठयांत आहेत. ज्यांचे ज्यांचे कुळनाम एक तेते सर्व एकमेकांचे नातेवाइक, अर्थात भाऊबन्द. मग ते कुठल्याही जातीचे असोत. असे बाबासाहेबांनीच अश्प्रुश्य मूळचे कोण? व ते अश्प्रुश्य कसे बनले?या ग्रंथात म्हटले आहे. इ.स.400ला ब्राम्हण गुप्त राजांनी गायीला पवित्र माणून गौहत्त्या करणार्यास म्रुत्यूदंडाची शिक्षा जाहीर केल्यानंतर ज्या ज्या महारांनी मेलेल्या गायींचे मांस खाने चालूच ठेवले तेते अश्प्रुश्य झाले. इथे गायीची हत्त्या होत नव्हती. म्रुत्युदंडाचा प्रश्नच येत नव्हता. ज्यांनी मांस खाने सोडले तेते सवर्ण झाले. अश्प्रूश्यता इस 400ला जरी सुरू झाली. तरी तिची तिव्रत्ता आदि शंकराचार्यांच्या काळात , 9व्या शतकात वाढली.

पेशवाईत तर अतिशय लाजिरवाने जिणे झाले. याचाच बदला 500शूरवीर महारांनी 1जानेवरी 1818ला ब्रिटिशांकडून पेशव्यांविरुध्द लढून घेतला. फक्त 500 शूरवीर महारांनी 30हजार पेशव्यांना भीमाकोरेगावच्या ऐतिहासिक लढाईत हरवीले. अर्धे अधिक पेशवे सैनिक कापून टाकले. आणि अत्त्याचारी पेशवाई सम्पवीली. असा पराक्रम जगात कोठेच सापडणार नाही. म्हणूनच या लढाईत बलिदान दिलेल्या 22शूरवीर महारांची नांवे ब्रिटिशांनी उभारलेल्या भीमाकोरेगावच्या विजयी स्थंभावर कोरलेली आजही दिसतात.त्या विजयी महार शुरविरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1जानेवारीला लाखों बौद्ध (पुर्वाश्रमीचे महार) भीमाकोरेगावला जातात.

मौल्सवर्थ शब्दकोषात डा. विल्सनच्या मते महार राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र. त्यास इतिहासकार डा.ओपर्ट व केतकर यांचेही समर्थन लाभलेले आहे. इतिहासकार वामनराव भट म्हणतात महाराष्ट्राच्या पठारावर महार जमात मोठ्या प्रमाणात राहत होती. म्हणून महाराष्ट नाव पडले. इतिहासकार बेडेन पॉवेल म्हणतात प. भारतात महारांचे राज्य होते म्हणून या प्रदेशाला महाराष्ट म्हणतात. अशा या महाआर्यानी बाबासाहेबांसोबत 14आँक्टोबर 1956ला जगातील सर्वोतम बौद्ध धम्म स्वीकार केला. आणि सम्पूर्ण भारतात इतकेच नव्हे तर संपूर्ण जगात हा बौद्ध धम्म नेऊ इतका दूर्दम्य आशावाद आम्ही आम्बेडकरवादी बाळगतो.

आमच्या पुढे अशक्य असे काहीच नाही. कारण आमचे आदर्श विश्वशांती दूत तथागत भ.बुद्ध आणि विश्वरत्न डा.बाबासाहेबांचे तत्वज्ञान आहे ज्याला जगात तोड़ नाही.आम्बेडकरवादी धम्म प्रचार प्रसार करीत आहेत.म्हणूनच आज अनेक देशांतील मानवी समूह बुद्ध धम्म स्विकारत आहेत. - एम बी सिंगारे

No comments:

Post a Comment