Friday, August 9, 2019

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास:अतुल भोसेकर

अतुल भोसेकर  मोब. ९५४५२७७४१०
महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 1
Image result for महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास: भाग 4 :अतुल भोसेकरबुद्धगया (बोधगया) हे जगभरातील बौद्ध अथवा बुद्ध विचार मानणाऱ्यांसाठी एक अतिशय पवित्र श्रद्धा स्थळ आहे. याच ठिकाणी राजपुत्र सिद्दार्थाला अतिशय खडतर प्रयत्नांती ज्ञानप्राप्ती होऊन बुद्धत्त्व प्राप्त झाले होते. जगातील अंतिम सत्य हे चार अरिय सत्य असून अरिय अष्टांगिक मार्गाने मनुष्य निब्बाण पर्यंत पोहचू शकतो हे त्यांनी प्रतिपादले. 

बुद्धांच्या काळी बुद्धगयेचे नाव “उरुवेला” होते व ते नेरंजना नदी किनारी वसले होते. आता या नदीचे नाव फाल्गु झाले आहे. साधारणतः इ. स. पूर्व २५० मध्ये सम्राट अशोकाने आपल्या राज्याभिषेकाच्या ११व्या वर्षी येथे येऊन येथील “बोधीवृक्षाला” वंदन केले होते. या जागेचे पावित्र्य ओळखून अशोकाने येथे १,००,००० सोन्याच्या मोहरा दान देऊन विहार बांधण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर येथील बोधीवृक्षाचे योग्य जतन व्हावे यासाठी त्याच्या भोवती १० फूट उंच भिंत देखील बांधली. 

भ.बुद्धांना ज्याठिकाणी ध्यान करून बुद्धत्त्व प्राप्त झाले त्या ठिकाणी शिल्पाकृतीने सजवलेले एक चकाकते वज्रासन बनवले. मुख्य विहाराच्या जवळ, पूर्वेकडे भ. बुद्धांनी ‘चंक्रमण’ केलेल्या ठिकाणी सम्राट अशोकाने २२ कोरीव दगड ठेवले व प्रत्येकावर धम्मलिपि मध्ये अ ते ट हा अक्षरे कोरून ठेवली. अशोकाने केलेल्या या सर्व कामाचा उल्लेख त्याच्या ८व्या शिलालेख, सांची स्तूप क्र.१ च्या तोरणावर आणि भारहूत स्तूपाच्या पट्टीवर पाहायला मिळतात.
महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 3
इ.स ६०० च्या दरम्यान राजा शशांकने बोधिवृक्ष व महाविहारातील बुद्ध प्रतिमा तोडण्याचा आदेश दिला. त्याने बंगाल प्रांतातील अनेक बुद्धविहार आणि स्तूप तोडून टाकले होते. अतिशय शिताफीने कामरूपचा राजा भास्करवर्मन ने बुद्ध प्रतिमा आणि बोधिवृक्ष त्याच्या विश्वासू मंत्र्यांमार्फत वाचविले व साधारणतः इ.स. ६२० मध्ये बोधीवृक्षाभोवती २४ फूट उंचीची भिंत बांधली.
इ.स. ६३७ मध्ये हुयान त्सांग ने महाबोधी महाविहाराला भेट दिली. त्याच्या लेखात आलेला प्रवेशद्वार व भव्य मंडप हा त्याकाळी ब्रह्मदेशाचा राजा साडो याने बांधला होता. हुयान त्सांगच्या भेटीच्या आधी येथील फाल्गु (नेरंजना) नदीला पूर आला होता व त्याचे पाणी व वाळू संपूर्ण महाविहार परिसरात पसरली होती. महाविहारात अक्षरशः अडीच फूट उंच वाळू साचली होती व त्यात वज्रासन देखील दाबले गेले होते. हुयान त्सांग ने वर्णन केल्याप्रमाणे महाबोधी महाविहार १७० फूट उंच होते व संपूर्ण बांधकाम प्लास्टर केलेल्या लाल रंगाच्या निळसर छटा असलेल्या विटांनी बनविले होते. महाविहाराच्या भिंतींवर अनेक ठिकाणी कोनाडे केले होते व त्यात सोन्याचा मुलामा असलेली बुद्धमूर्ती ठेवल्या होत्या. महाविहाराच्या पूर्वेला की तीन मजली मंडप होता व त्याच्या आतील भिंतीवर सोन्याचांदीने सजवलेली कलाकुसर होती. महाविहाराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अवलोकितेश्वर आणि मैत्रयाच्या १० फूट उंच मूर्ती होत्या. बोधीवृक्षाच्या भोवती उंच भिंत होतीबुद्धांच्या बुद्धगये येथील ७ आठवड्यांच्या वास्तव्यात त्यांनी प्रत्येक ठिकाणी ध्यानमग्नतेत व्यतीत केलेल्या साठी ठिकाणी सम्राट अशोकाने सुंदर कोरीव स्मृतिस्थळ बांधल्या होत्या. या व्यतिरिक्त अशोकाने अनेक ठिकाणी स्तूप बांधली ज्यात सुजाताने बुद्धांना ज्याठिकाणी खीर दिली, कश्यप बंधूंनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व मातीपोसक जातकाचे ठिकाण सामील होते.
हे सर्व स्तूप १८व्या शतकापर्यंत अस्तित्वात होती. नंतर महंतांच्या अलिखित सूचनेनुसार (हे सविस्तर नंतर येणार आहे), तेथील गावकऱ्यांनी हे स्तूप पोखरून तेथील विटा काढून आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. कनिंघम ला नंतर उत्खनन करताना लाखेच्या अनेक मूर्ती सापडल्या.

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 5
बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराला भेट देणे जगातील बौद्ध राष्ट्रातील सर्वच लोकांना जमणारे नव्हते. साधनांची कमतरता, प्रतिकूल प्रवास आणि त्याच बरोबर भारतातील मुस्लिम राज्य व त्यामुळे उद्भवलेली युद्धयजन्य परिस्थिती या मुळे बुद्धगया येथील लोकांचा ओढा कमी झाला. यावर मात करण्यासाठी अनेक बौद्ध देशातील राजांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची मोजमाप घेऊन आपल्या राज्यात महाबोधी महाविहाराची प्रतिकृती करण्यास सुरुवात केली.
ब्रह्मदेशाचे राजे किंझिट्ठा यांनी काही खास कारागार बुद्धगयेला पाठून महाबोधी महाविहाराचे आराखडे तयार केले व पगान या ठिकाणी महाबोधिची प्रतिकृती तयार केली.
इ.स. १४५२ मध्ये तिबेट मध्ये महाविहाराच्या आकाराचे स्तूप बनविण्यात आले व त्यात लामांच्या अस्थी ठेवण्यात आल्या.इ.स. १४७२ मध्ये पेगू चा राजा धम्मचेतियाने कारागीर पाठवून महाबोधिच्या संपूर्ण रचनेचा आराखडा तयार केला व अतिशय सुंदर आणि भव्य असे महाविहार (स्थानिक भाषेत शेवगुगयी) बांधले.
इ.स. १४४८ मध्ये थायलंडचे राजे तिलोकराजा याने महाबोधी महाविहाराच्या धर्तीवर महाबोधरामा, वाट-जेट-यॉट नावाचे महाविहार बांधले. त्यांनी खास श्रीलंके वरून बोधीवृक्षाच्या झाडाचे रोपटे आणून बांधलेल्या महाविहाराच्या बाजूला लावले. एवढेच नव्हे तर बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण परिसराची (भ. बुद्धांचे सात महत्त्वाच्या ठिकाणांसहित) मूळ आकाराची प्रतिकृती बनवली. पुढे १६व्या ते १८व्या शतकाच्या दरम्यान चियांग राई या भागात महाबोधी महाविहाराच्या आकाराचे विहार बनविण्यात आले.१६व्या शतकात नेपाळ वरून एका उपासकाने बुद्धगयेला येऊन महाबोधी महाविहाराचा नकाशा बनविला आणि नेपाळ मधील पाटण येथे महाविहार साकार केले. १९३४ च्या भूकंपामध्ये ते उध्वस्त झाल्यानंतर तेथे पुन्हा ते उभारण्यात आले.
१७४८ मध्ये चीन मध्ये पहिल्यांदा महाबोधी महाविहाराच्या आकाराचा विहार – उ ता झू पेकिंग शहराच्या लगत बनविण्यात आला.
या दरम्यान बदलेल्या परिस्थिती मुळे, बुद्धगयेकडे परदेशी भिक्खू आणि उपासकांचा ओघ कमी झाला. महाबोधी विहार (संघाराम) तर ओस पडले होते व महाबोधी महाविहारात अगदीच थोडे भिक्खू शिल्लक राहिले. कालांतराने तेही निघून गेले.
१७व्या शतकाच्या पूर्वार्धात शैव पंथाचा गोसावी घमंड गिरी हा बुद्धगया येथे येऊन राहिला. हळू हळू त्याचा शिष्यवर्ग वाढायला लागला. स्वतःला महंत म्हणून घेणाऱ्या या घमंड गिरीने महाबोधी महाविहाराच्या जवळ व महाबोधी संघरामाच्या परिसरात आपला आश्रम स्थापन केला. महाबोधी महाविहारातील काही बुद्धमूर्ती त्याने आणून आपल्या आश्रमात ठेवल्या आणि देव-देवतांच्या मूर्ती म्हणून पूजा अर्चना सुरु केली.
महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 8

Image result for महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास: भाग ८:अतुल भोसेकरअनागरिक धम्मपालांनी टाकलेली कोर्ट केस ८ एप्रिल १८९५ रोजी सुनावणीला आली. ही केस बरीच चालली व अनेक लोकांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. काही प्रमुख साक्षीदार आणि त्यांची साक्ष अशी:

बिपीन बिहारी बॅनर्जी, महाबोधी महाविहाराचे मुख्य संरक्षक – या महाविहारात कोणी हिंदू पूजा करत नाही. मीही शक्यतो महाविहारात जात नाही कारण मी हिंदू आहे आणि माझा धर्म मला तसे करण्यास मनाई करतो. मी बुद्धांची मूर्ती खाली ठेवलेली पहिली आहे. नुकतेच सुट्टीवरून आल्यानंतर मी बुद्धांच्या मूर्तीला भगवे कापड गुंडाळलेले पहिले तसेच मूर्तीच्या कपाळावर लाल रंग लावण्यात आला होता व तेथे एक ब्राह्मण पुजारी पूजा करताना दिसला. यापूर्वी कधीही कोणीही ब्राह्मण येथे पूजा करायला येत नसे.
Image result for महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास: भाग ८:अतुल भोसेकर
महातली सुमंगला, सिंहली बौद्ध भिक्खू – धम्मपालांबरोबर त्यादिवशी महाविहारात होतो जेव्हा महंतांच्या लोकांनी बुद्धमूर्ती काढून घेतली. त्यावेळेस आम्ही कुठलाही प्रतिकार केला नाही मात्र ही जपानवरून आलेली मूर्ती असून तिचा सन्मान करणे योग्य आहे असे म्हटले. त्यावेळेस काही लोकं धम्मपालवर धावून गेली.

डॉ. हरी दास चॅटर्जी, गया मधील डॉक्टर – १८७३ मध्ये मी पहिल्यांदा महाबोधी महाविहार पहिले. नंतर त्याची डागडुजी झाल्यानंतर देखील पहिले. मी तेथे केवळ बौद्ध लोकं व भिक्खू येताना पहिले आहेत. ते तेथे मेणबत्ती व धूप जाळतात. तेथे कोणी हिंदू कधीच जात नाही.

बाबू दुर्गा शंकर भट्टाचार्य, जमीनदार – मी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार अनेकवेळा पहिले आहे. तेथे बुद्धमूर्ती जवळ अनेक बौद्ध कपडे, पैसे दान देताना पहिले आहे. सध्याच्या महंताने बर्माच्या राजाने महाबोधी महाविहाराला दान दिलेले अनेक सोन्या चांदीच्या वस्तू स्वतःजवळ ठेवल्या आहेत हे मला महंतांच्या एका शिष्यानेच सांगितले व जेथे ठेवल्या ती खोली देखील दाखवली आहे.

Image result for महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास: भाग ८:अतुल भोसेकरपंडित गंगाधर शास्त्री, मुख्याध्यापक ज़िल्हा शाळा, गया – महाबोधी महाविहार हे बौद्धांचे स्थान आहे, हिंदूंचे नव्हे. मी हे महाविहार फक्त बाहेरून पहिले आहे कारण माझे धर्मशास्त्र मला तेथे जायला परवानगी देत नाही. तेथे गेलो तर मला प्रायश्चित घ्यावे लागेल.

आपल्या १०२ पानांच्या निकालपत्रात डी.जे. मॅकफेरसन यांनी जयपाल गिरी, महेंद्र गिरी, बिमल देव गिरी आणि आणखीन दोघे जणांना IPC च्या कलम २९५, २९६ आणि २९७ अन्वये दोषी धरत प्रत्येकाला १ महिना साधी कारावास व रुपये १०० दंड दिला. हा खटला खूप गाजला. न्यायालयातील साक्षी दरम्यान झालेल्या प्रश्न उत्तरावरून एक अधोरेखित झाले कि बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच असून तेथे हिंदू महंताने अनधिकृत कबजा मिळवला आहे.

महंताने गया कोर्टाच्या विरुद्ध कलकत्ता उच्च न्यायालयात अपील केले जेथे ही शिक्षा रद्द करण्यात आली. अनागरिक धम्मपालांना मोठा मनस्ताप झाला.

जेव्हा लॉर्ड कर्झन व्हाईसरॉय झाले तेव्हा त्यांना बर्मी लोकांच्या शिष्टमंडळाने बोधिवृक्ष आणि महाबोधी महाविहार महंताच्या ताब्यातून सोडवून बौद्धांकडे सोपवण्याची विनंती केली. या प्रकरणात कर्झन यांनी लक्ष घालून, १९०३ मध्ये बुद्धगया येथे आले. यावेळेस महंत त्यांना भेटण्यास आला. कर्झन यांनी त्याला विचारले कि तो हिंदू असूनही बुद्धविहारावर कब्जा का केला आहे, काय तो बुद्धांची पूजा करतो आहे? महंत म्हणाला कि बुद्धांना तो विष्णूचा अवतार मानतो. यावर कर्झन म्हणाले तू तर शैव पंथीय आहेस, वैष्णव नाहीस, यावर महंत निरुत्तर झाला. कर्झन यांची खात्री पटली कि म्हटलं केवळ महाबोधी महाविहारावर ताबा मिळवायचा आहे. मात्र यात जास्त घाई करूनही चालणार नव्हते हे कर्झन ओळखून होता.

अनागरिक धम्मपाल यांनी पुरोगामी हिंदूंची मने वळविण्यास सुरु केले. 1922 साली गया येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात महाबोधी सोसायटी तर्फे महाविहाराच्या संपूर्ण माहितीची पुस्तिका वाटली व महाविहाराच्या ताब्यासंबंधी मागणी केली. बर्मी शिष्टमंडळाने देखील आग्रहाची मागणी केली (बर्मा देश त्यावेळेस भारताचा भाग होता). अधिवेशनात ठराव मंजूर झाला आणि एक समिती स्थापन करण्यात आली. तिचे प्रमुख राजेंद्र प्रसाद यांना नेमण्यात आले. आणखी एक सदस्य होते ज्यांचे नाव स्वामी रामोदार दास होते. त्यांनी नंतर बौद्ध धम्म स्वीकारला व राहुल सांकृत्यायन म्हणून पुढे प्रसिद्ध झाले.

Image may contain: one or more people, tree, outdoor and natureImage may contain: one or more people१९२५ साली समितीने अखिल भारतीय काँग्रेस आणि हिंदू महासभा यांनी एकत्रित येऊन हा प्रश्न सोडवावा असे ठरले. त्यानुसार हिंदू महासभेच्या ४००० सदस्यांपुढे धम्मपाल यांनी आपली भूमिका मांडली. या परिषदेत एक ठराव पारित करण्यात आला तो म्हणजे महाबोधी महाविहारात पूजेचा संपूर्ण हक्क बौद्धांना देण्यात यावा व महाविहार समितीमध्ये त्यांचा सहभाग असावा. बर्मी सदस्य उ टोक क्यि यांनी एक बिल मांडून भारत, श्रीलंका आणि बर्मा येथील बौद्धांना या समितीत स्थान असावे असे सुचविले. महंताने या सर्वाला नकार दर्शविला व महाबोधी महाविहाराचा ताबा देण्यास नकार दिला.

Image result for महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास: भाग ८:अतुल भोसेकरअनेक दशकांची धावपळ, वार्धक्य, खालावलेली तब्येत आणि महाबोधी महाविहार प्रकरणी निघत नसलेला तोडगा यामुळे अनागरिक धम्मपाल खचले होते. त्यांनी या लढ्यातून माघार घेत, सर्व सूत्र आपले सचिव व मित्र देवप्रिय वालीसिंह यांच्याकडे सुपूर्द केली. १९३३ साली धम्मपाल यांचे निर्वाण झाले. ४२ वर्षे जो एकहाती लढा त्यांनी दिला व जगाचे लक्ष याकडे वेधले तो अनोखा लढा होय. महाबोधी महाविहाराचे संपूर्ण अधिकार बौद्धांकडे असावे ही त्यांची मागणी अपूर्णच राहिली.

महाबोधी महाविहाराचा संपूर्ण इतिहास – भाग 9
अनागरिक धम्मपालांच्या निर्वाणानंतर, त्यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी, भारतातील व इतर बौद्ध राष्ट्रातील बौद्धांच्या मदतीने महाबोधी महाविहाराचा प्रश्न सतत उपस्थित करीत राहिले. त्यांनी भारतातील अनेक हिंदू मित्र जोडले होते ज्यांना महाबोधी महाविहाराच्या प्रश्नावर सकारत्मक निकाल हवा होता. १९३५ साली हिंदू महासभेने कानपुर मध्ये अधिवेशन भरविले होते. बर्माचे विद्वान भिक्खू उ ओट्टाम हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला भारत, श्रीलंका व बर्मा वरून अनेक बौद्ध उपस्थित राहिले होते. बौद्धांना महाविहारात पूजे बरोबरच समितीमध्ये देखील अधिकार हवा या मागणीला या अधिवेशनात पाठिंबा मिळाला मात्र हा ठराव संमत करताना उपस्थित अनेक हिंदू स्वामींनी त्याला विरोध दर्शवित व्यासपीठाकडे धाव घेतली. राजेंद्र प्रसाद यांना मदत करण्यासाठी आणखी एक समिती तयार येथे करण्यात आली होती.
६ मार्च १९३७ मध्ये राजेंद्र प्रसाद यांनी अखिल भारतीय काँग्रेस समोर महाबोधी महाविहार संबंधीचे बिल मांडले व येणाऱ्या काळात नवीन मंत्र्यांनी ते लगेच अमलात आणावा असा आग्रह धरला. जगातील बौद्ध राष्ट्रातील प्रमुखांनी अत्यंत मुत्सद्दीपणे महाविहारचे प्रश्न आंतराष्ट्रीय मंचावर मांडून भारतावर दडपण आणत होते.
स्वातंत्रोत्तर लगेचच महाबोधी सोसायटीने पाटणा मध्ये बौद्ध व हिंदूची एकत्रित बैठक बोलावली. महंताला महाविहाराचा हक्क द्यायचा नव्हता. खरं तर हिंदू महासभेच्या शब्दाबाहेर महंत नव्हता किंवा तो सगळ्यांविरुद्ध जाऊच शकला नसता मात्र तरीही त्याने विरोध कायम ठेवला. या बैठकीत सगळा विचार करून महाबोधी महाविहारावर बौद्ध हिंदू यांची एक समिती बनवून त्यांचा संयुक्त हक्क राहील असे ठरले गेले. याच दरम्यान आंतराष्ट्रीय आशिया संमेलनात देखील बौद्ध राष्ट्रातील चीन, तिबेट, बर्मा आणि श्रीलंका येथील प्रतिनिधी यांनी पंतप्रधान नेहरूंना यात लक्ष घालून लवकरात लवकर महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे असा आग्रह धरला. नेहरूंना देखील हा प्रश्न मिटवून शेजारील राष्ट्रात भारताबद्दल आदर वाढवायचा होता.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर १९४८ साली बोधगया मंदिर अधिनियम याचा मसुदा जनतेच्या सूचनांकरिता प्रसारित करण्यात आला. या अधिनियमानुसार समितीमध्ये ४ बौद्ध व ४ हिंदू असतील व समितीचा अध्यक्ष म्हणून गया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील असे नमूद करण्यात आले.
हा अधिनियम वाचून बौद्धांची घोर निराशा झाली कारण या समितीमध्ये सर्वात जास्त मेंबर्स हे हिंदू असणार होते. मुख्य म्हणजे हे महाबोधी महाविहार बौद्धांचे असताना देखील हिंदू त्या समितीवर असणार याचा मनस्ताप बौद्धांना झाला. तरी देखील बौद्धांना या समितीत समाविष्ट करता येणार होते म्हणून हा अधिनियम १९ जून १९४९ मध्ये पारित करण्यात आला. याला पुढे “बोधगया मंदिर अधिनियम १९४९” असे संबोधण्यात आले.
२८ मे १९५३ साली, वैशाख पौर्णिमेला महंताने आपले सारे हक्क समितीकडे एका जाहीर कार्यक्रमात सुपूर्द केले.
बौध्दगयाच्या परिसरातील उत्खनन आणि संवर्धन करण्यासाठी १९६६ मध्ये एक बृहत योजना सादर करण्यात आली ज्यात बुद्धगयेतील ३०० एकर जमीन ताब्यात घेऊन उत्खनन करण्यात येणार होते. त्यासाठी लागणाऱ्या सतरा लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र ही योजना नंतर बासनात गुंडाळण्यात आली. त्याचे कारण मात्र कळले नाही.
हा अधिनियम जरी पारित झाला तरीही बौद्धांमध्ये या अधिनियम आणि समितीबद्दल प्रचंड नाराजी होती. एक बौद्ध स्थान (जे पुरातत्त्वीय संशोधनातून सिद्ध झाले होते) व त्यावरची समिती हे बौद्धांच्याच हाती हवी होती.
१९९१ साली बिहारचे मुख्यमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव यांची निवड झाली. महाबोधी महाविहाराबद्दल त्यांना आदर होता व बौद्धांचे मत योग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. १९९२ मध्ये त्यांनी “बोधगया मंदिर अधिनियम १९४९” या ऐवजी नवीन “बोधगया महाविहार अधिनियम” आणू पाहत होते ज्यामुळे संपूर्ण बुद्धगया महाबोधी महाविहार परिसर व त्यावरची समितीवर फक्त बौद्धच असतील असे नमूद केले होते. हा अधिनियम पारित करून घ्यायचा असा त्यांचा मानस होता. मात्र त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने हिंदू कट्टरवाद्यांच्या साथीने याला प्रखर विरोध दर्शविला व हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला.
भारतीय जनता पार्टीच्या कट्टरवादी आणि मुर्खपणामुळे बिहारचे राजकारण ढवळून निघाले आणि शांततेचे प्रतीक व बुद्धत्त्व प्राप्तीचे स्थान असलेले बौद्धगयेतील महाबोधी महाविहार परिसर एका घाणेरड्या राजकारणाच्या वेढ्यात अडकला.

No comments:

Post a Comment