11.9 .18
चाल : सैराट झालं जी
तळपत सूर्य रुपात, लखलखता तारा विश्वात
तळपत सूर्य रुपात, लखलखता तारा विश्वात
धुरंधर
ज्ञान शस्त्रात, गुलामीवर करण्यास मात
हो असा
भांडलाय, भारतामंदी
अन हातामंदी हक्क दिले जी
अधिकारी झालोजी ३
अन हातामंदी हक्क दिले जी
अधिकारी झालोजी ३
हो संधीच देऊन सारी, हरएक क्षेत्रात भारी
दाविण्या अक्कल हुशारी, तरतूद घटनेत न्यारी
असा मांडलाय, कायदा अटी
अन शिक्षणाची लाट आली जी
अधिकारी झालोजी ३
हो
मनुस्मृती जाळलीया, मातीत गाळलीया
विषमता मोडलिया भिमानं ....भिमानं
निर्मिले मानवात, भाऊबंधकीच नात
कोरलया काळजात भिमानं
रुजले बीज समतेचे हृदयी रुजले
पुजले न्याय सत्याचे तत्व पुजले
सरले भूक मारून जगणे सरले
भरले नवचैतन्य अंगी भरले
असा कडाडला , सभागृहामंदी
अन मोकळीच वाट केली जी
अधिकारी झालोजी ३ (१)
विषमता मोडलिया भिमानं ....भिमानं
निर्मिले मानवात, भाऊबंधकीच नात
कोरलया काळजात भिमानं
रुजले बीज समतेचे हृदयी रुजले
पुजले न्याय सत्याचे तत्व पुजले
सरले भूक मारून जगणे सरले
भरले नवचैतन्य अंगी भरले
असा कडाडला , सभागृहामंदी
अन मोकळीच वाट केली जी
अधिकारी झालोजी ३ (१)
लोहाराने लोहारकी, कुंभाराने
कुंभारकी,
चांभाराने चांभारकी , सोडले .......सोडले
महारात कमिशनर, कुणब्यात कलेक्टर,
मुस्लीम बॅरिस्टर घडले
घडले भीम किमयाने सारे घडले
लढले भीम समतेच्या साठी लढले
शमले अन्यायाचे वादळ शमले
नमले तव चरणी अशोका नमले
देश बांधीयला, लोकशाही मंदी
अन ज्याचा त्याचा वाटा दिलाजी
अधिकारी झालोजी ३
चांभाराने चांभारकी , सोडले .......सोडले
महारात कमिशनर, कुणब्यात कलेक्टर,
मुस्लीम बॅरिस्टर घडले
घडले भीम किमयाने सारे घडले
लढले भीम समतेच्या साठी लढले
शमले अन्यायाचे वादळ शमले
नमले तव चरणी अशोका नमले
देश बांधीयला, लोकशाही मंदी
अन ज्याचा त्याचा वाटा दिलाजी
अधिकारी झालोजी ३
कवी: अशोक भगत (वणी- यवतमाळ )
No comments:
Post a Comment