Saturday, August 3, 2019

मंदिर बांधतो आम्ही

मंदिर बांधतो आम्ही,
जेऊ घालतो मायबाप.
होतो पापमुक्त आम्ही
पुन्हा करण्यास पाप.
येथील तिर्थक्षेत्रे दलालांची पेठ आहे.
माणूस पाहून पुजेचे वेगवेगळे रेट आहे.
येथील लोक सारे भलेही मूर्ख आहे.
त्यातील थोडे काही भलतेच धूर्त आहे.
देवाचा जन्म होण्यास अवकाश तूर्त आहे.
कळले कधीच नाही
मूर्त की अमूर्त आहे
-भीमराव गोटे की वाल से

No comments:

Post a Comment